Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे हा पर्यटकांचा कोकणातील फेमस पिकनिक स्पॉट आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात समुद्रकिनारी तारकर्ली गाव वसले आहे. तारकर्ली पर्यटन स्थळे चला तर या लेखात आपण पाहूया तारकर्ली बीचवर आणि बीचजवळ करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टी काय आहेत.

चला पाहूया तारकर्ली बीचवर आणि बीच जवळ करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टी काय आहेत.

तारकर्ली बीचबद्दल माहिती

ठिकाण :-तारकर्ली, मालवण, सिंधूदुर्ग
मुंबईपासून अंतर :-490 किमी
पोहचण्याचे मार्गमालवणला पोहोचण्यासाठी तीन रेल्वेस्टेशन आहेत.
कणकवली, सिंधुदूर्ग (ओरोस) आणि कुडाळ.

कणकवली रेल्वेस्टेशनहुन जाण्यासाठी :-

Auto ने कणकवली रेल्वे स्टेशन ते एसटी डेपो,
त्यानंतर कणकवली ते मालवण ( ४५ किलोमीटर ) एसटीने मग मालवण ते तारकर्लीला जाणारी एसटी.
किंवा सकाळच्या वेळी कणकवली डेपोसमोरून मालवणला जाण्यासाठी प्रायव्हेट कंपनीच्या बसेसही आहेत, त्याने मालवणला वा तारकर्लीला पोहोचू शकतो.

सिंधुदुर्ग (ओरोस) रेल्वेस्टेशनवरून जाण्यासाठी :-

रेल्वेस्टेशनच्या बाहेरून मालवणला ( २६ किलोमीटर ) जाणारी एसटी पकडू शकतो.
किंवा स्टेशनपासून काही एक किलोमीटर वर रानबांबुळी ह्या एसटीबस थांब्याहुन मालवणकडे जाणार एसटीने जाऊ शकतो.

कुडाळ रेल्वेस्टेशनहुन जाण्यासाठी :-

Auto करून कुडाळ रेल्वे स्टेशन ते एसटी डेपो,
मग कुडाळ ते मालवण ( २८ किलोमीटर ) एसटीने प्रवास करू शकतो.

मुंबई- गोवा हायवेने जायचे असेल तर मुंबईहूनही प्रायव्हेट कंपनीच्या बसेसचा पर्याय आहे. या बसेस सायन-वाशीमार्गे मालवण किंवा बोरिवली, भांडुप, ठाणेमार्गे मालवण अशा जातात.

मालवण शहराच्या दक्षिणेला 7 किमी अंतरावर तारकर्ली गाव आहे. या ठिकाणी कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम आहे. तारकर्ली बीचला जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणूनही मान्यता मिळाली आहे. येथे बांबूची आणि सुपारीची झाडे आहेत. येथील गावपण आणि शांतता पर्यटकांना कायमच भावते.

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

  • पहिला दिवस

    • तारकर्ली बीच,
    • देवबाग बीच,
    • जय गणेश मंदिर.
  • दुसरा दिवस

    • Snorkeling,
    • Scuba Diving,
    • Parasailing,
    • त्सुनामी आयलंड,
    • तारकर्ली – देवबाग येथील बीचवर वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी डॉल्फीन दिसतात. water sports packages कमी किमतीत मिळतील.
  • तिसरा दिवस

    • सिंधुदुर्ग किल्ला,
    • रॉक गार्डन (या गार्डनचे वैशिष्ट्य म्हणजे मालवण शहरापासून जवळच खडकामध्ये उभारलेले गार्डन आहे. येथे असलेले लायटिंगचे कारंजे विशेष आकर्षण आहे. Selfie साठी उत्तम spot आहे.)

तारकर्ली बीचजवळ भेट देण्यासारखी सर्वोत्तम ठिकाणे

Tarkarli Beach

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

Snorkeling

Tarkarli Snorkeling

Scuba Diving

Tarkarli Scuba Diving

Parasailing

Parasailing

Sindhudurg Fort

Sindhudurg Fort

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी

तारकर्लीजवळची पर्यटनस्थळे:- ( हे स्पॉट पाहण्यासाठी two wheeler भाडे स्वरूपात उपलब्ध आहेत. )

मालवण, देवबाग, तारकर्लीमध्ये हॉटेल आणि निवासाचीही उत्तम व्यवस्था:-

येथे MTDC चे रिसार्ट आहेत, सुरुच्या बनात असलेले rooms असून मोफत parkingची सोय आहे. आहेत, त्यामुळे याठिकाणी राहणे पर्यटक पसंत करतात.

  • MTDC resort Malvan,
  • MTDC – Tarkarli Resort,
  • MTDC – Devbag Resort.

याशिवाय जर घरगुती राहण्याची व जेवणाची सोय हवी असेल तरी तीदेखील उत्तमप्रकारे उपलब्ध आहे.

  • Chintamani resort tarkarli – रुम्स, नाश्ता आणि जेवण,
  • Sea view resort tarkarli – रुम्स, जेवणाची सोय,
  • Gajanan resort tarkarli – रुम्स, नाश्ता, जेवणाची सोय,
  • Nirmala beach stay malvan – नाश्ता, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय, रुचकर जेवण, एकदा तरी try केलेच पाहिजे.

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे