Taramumbari - तारामुंबरी | Devgad Beach

आज आपण घरबसल्या सहल करूयात ती फळांचा राजा हापूस आंब्याचं ( Devgad Alphonso mangoes ) हक्काचं माहेरघर असलेल्या देवगड तालुक्यातील Taramumbari - तारामुंबरी ह्या गावाची.

Taramumbari
Taramumbari - तारामुंबरी | Devgad Beach
गावाचे नावTaramumbari - तारामुंबरी
तालुकाDevgad - देवगड
जिल्ह्यासिधुदुर्ग
आकर्षणतारामुंबरीचा समुद्र किनारा आणि खाडी संगम, आंब्यांच्या बागां, विठ्ठलरखुमाईचं मंदिर, तारामुंबरी मत्स्यालय, देवगड पवनचक्की

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक आकर्षणांपैकी एक लक्षवेधी ठिकाण, म्हणजे तारामुंबरीचा समुद्र किनारा Taramumbari Beach. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंब्यांच्या बागांची आरास, जणू आपल्या स्वागतासाठी उभी ठाकली आहे असं आल्हाददायक दृश्य या गावात प्रवेश करताना जाणवू लागतं. किनारपट्टीचा मोकळा वारा त्याची जादू करत आपल्या प्रवासाचा शीण हलका करत जातो. खालच्या अंगाला पोचताच खाडी लागते, जिच्या एका कवेत तारामुंबरी आणि दुसऱ्या कवेत मिठमुंबरी ( Taramumbari and Mithmumbari ) अशी गावं विसावली आहेत.

नदीकिनारी असलेलं विठ्ठलरखुमाईचं मंदिर म्हणजे जणू विलक्षण निसर्गाच्या सानिध्यात परमेश्वरी प्रसन्नतेचा सुवर्णकांचन योगच. खालील छायाचित्रं पाहून तुमच्या लक्षात येईल कि एका बाजूला हिरवळीची जादू आणि दुसऱ्या बाजूला निखळ प्रवाहाच्या विस्मयकारी तटावर उभारलेलं हे मंदिर आशीर्वादांबरोबरच कित्तीतरी सकारात्मकता देखील देऊन जातं.

गावातील मनमोहक छायाचित्रे

किनारपट्टी म्हटलं कि आवर्जून येतं ते आकर्षण मत्स्यालयाचं. ती त्रुटी भरून काढायला सज्ज आहे इथलं "तारामुंबरी मत्स्यालय" ( Taramumbari Aquarium ),

तारामुंबरी मत्स्यालय ( Taramumbari Aquarium )

अरबी समुद्राला लागून डोंगरी परिसरात नैसर्गिक ऊर्जेची दखल घेत उभी ठाकते ती इथली देवगड पवनचक्की. वीजपुरवठ्यासाठी तारामुंबरीला स्वावलंबी बनवणारी हि पवनचक्की एक आगळाच आकर्षणाचा विषय ठरते ते तिच्या भौगोलिक सौंदर्यामुळे. भव्य पवनचक्कीच्या पायथ्याशी उभे असताना डोंगर माथ्यावरचा बेभान वारा मनातील पामराला मोकळीक देणारा ठरतो. सारे अनामिक खुजेपण त्या निसर्गरम्य मोहक वातावरणापुढे नकळतच नतमस्तक होते. येथून लांबून दिसणारा अथांग समुद्र, त्याचा अवाढव्य किनारा आणि परतीच्या सातत्याने वाहणाऱ्या लाटा जणू नाविंण्याचा अजरामर दृष्टिकोन शिकवणाऱ्या ठरतात.

Devgad Zipline - कोस्टल झिपलाईन ( रोपवे )

हा उंचावरचा थरार अधिक रोमांचक करण्यासाठी इथे कोस्टल झिपलाईन आहे. सुमारे २८० फूट उंच आणि १८८५ फूट लांबीचा पट्टा या झिपलाईन ने फिरताना मुक्तविहार या सौज्ञेची प्रचिती येते. हि अनुभूती परत मिळवण्यासाठी खास काही पर्यटक पुनश्य आवर्जून येथे भेट देतात.

लहान मुलांसाठी आकर्षक असे काही खेळ येथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर नयनरम्य परिसराची भेट रुचकरही व्हावी म्हणून खवय्यांसाठी खास मेजवानी सुद्धा याठिकाणी उपलब्ध आहेत.