सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठीत | Sindhudurg Fort Information in Marathi ( Sindhudurg killa chi mahiti Marathi madhun, सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी मधून, Sindhudurg Fort in Marathi).
या लेखात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि माहिती मराठी मधून तुम्हाला वाचायला मिळेल.
आज आपण माहिती घेणार आहोत, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आणि पाऊलखुणा जपणाऱ्या एका किल्ल्याची. भारतातील सागरी अभियांत्रिकीच्या अनेक प्राचीन विलक्षण नमुन्यांपैकी एक दिमाखदार रचना म्हणजे “किल्ले सिंधुदुर्ग”.
सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी | Sindhudurg Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव :- | सिंधुदुर्ग किल्ला |
प्रकार :- | जलदुर्ग |
ठिकाण :- | सिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरा जवळ १.६० किलो मीटर अंतरावर. |
बेट :- | खुर्ते |
स्थापना :- | इ. स. १६६४ |
एकूण क्षेत्रफळ :- | ४८ एकर |
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :- | होडीने ( मालवण धक्क्यापासुन ते किल्लापर्यंत ) |
१६६४ साली खुर्त्त नावाच्या खडकाळ बेटावर किल्ला उभारण्याचा वसा शिवाजी महाराजांनी घेतला. हिरोजी इंदुलकरांच्या नेतृत्वाखाली हजारो मावळ्यांच्या अथक परिश्रमाने अखेर १६६७ च्या दरम्यान हा वसा मूर्तस्वरुपास आला.
सुमारे ३ किलोमीटर च्या परिसरात असलेल्या साधारण ४८ एकर वावरात या किल्ल्याची सफर करताना तेथील जाणकार मार्गदर्शक जरूर बरोबर घ्यावा. त्याच्या माहितगार नजरेतून हा किल्ला पाहताना समोर येणारे बांधणीचे बारकावे मन थक्क करणारे ठरतात.
शिसे, गुळ आणि चुन्याने भक्कम अश्या या बांधकामाची प्रत्येक लांबी, रुंदी तथा उंची अतिशय उद्दिष्टपुर्ण रचनेत जाणवते.
इथल्या टेहळणी बुरुजावरून दृष्टिक्षेप टाकताच, कोकण किनारपट्टीवर साडेतीनशेहून अधिक शतके विराजमान असलेल्या या रचनेचे भौगोलिक वैशिट्य आपोआपच अधोरेखित होते.
टेहळणी बुरुजाची छायाचित्रे
किल्ला वरील भुयारी मार्ग, खुष्कीच्या वाटा, नगारे बांधणी, बुरुजांची आखणी, दरवाजांच्या परिसरातील सुरक्षितता, असुरक्षित भासणाऱ्या जागी असणारी त्वरित सौरंक्षक योजना सारं काही मंत्रमुग्ध करतं.
पाण्याचे साठे, धान्याची कोठारे, खजिने आणि लढाई सामग्रीच्या जागा, घोडदळाचा पागा सारंकाही व्यवस्थापनाच्या अभिजात कौशल्याची उत्तुंग झळाळी दाखवत राहतं.
कडेलोटाचं टोक आणि कोठडीचं नुसतं प्रवेशद्वार पाहूनसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणारं अतिशय भयावह दृश्य आकलनास येतं.
असा हा जलदुर्ग किल्ला आवर्जून भेट द्यावी अशी एक ऐतिहासिक जागा आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क
To reach on Sindhudurg Fort timings and entry fee
मालवण धक्क्यावरून या किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या सुटतात. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत फक्त होडीच्या मार्गे या किल्ल्यावर जाता येतं. भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क ५० रु. आहे, आणि विदेशी पर्यटकांसाठी हे शुल्क २०० रु. आहे.
होडीने या दुर्गाच्या दिशेने केलेला छोटासा प्रवास वर्तमानातून शिवकालीन इतिहासाकडे नेणारा ठरतो. या किल्ल्यावर आजही काही वसाहतींचे वास्तव्य आहे. आई भवानीच्या मंदिराचं पावित्र्य राखण्याबरोबरच नेमाने नित्य उत्साहात तिचा उत्सव इथे साजरा करण्यात येतो.
महाराजांच्या आदर्शांचं पालन करण्यासाठी येथील प्रत्येक जण सतर्क तर असतोच, शिवाय येथे येणाऱ्या प्रत्येकात ती जागरूकता आवर्जून पोहोचवली जाते.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी मुख्य आकर्षणे
Most important places to see on Sindhudurg Fort
- प्रवेश द्वार
- गोड्या पाण्याची विहीर ( दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर )
- शिवराजेश्वरांचे मंदिर
- शिव मंदिर
किल्ल्याबद्दल महत्वाचे प्रश्न – Quiz regarding Sindhudurg Fort
१. कुठल्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सिंधुदुर्ग जिल्हा.
२. निर्मिती कधी करण्यात आली ?
उत्तर: १६६४ ते १६६७
३. किल्ला कुणी बांधला ?
उत्तर: हिरोजी इंदुलकरांच्या नेतृत्वाखाली
४. किल्ल्याची उंची किती आहे ?
उत्तर: सुमारे ३०-३५ फूट
वरील लेख “सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | Sindhudurg Fort Information in Marathi”
वरील लेख “सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | Sindhudurg Fort Information in Marathi”
नक्की वाचा :- कार्तिकी एकादशी मंदिरात दिव्यांची आकर्षक आरास
- sindhudurg killa सिंधुदुर्ग किल्ला का प्रसिद्ध आहे?