Topic Raja https://topicraja.com/ On topicraja.com, You will get to read articles on topics like Marathi cultural programs, articles on Marathi traditional programs, travel related ideas, and general knowledge. Sun, 05 Jul 2026 06:57:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0.1 https://topicraja.com/wp-content/uploads/2025/07/topic-raja-logo-150x150.png Topic Raja https://topicraja.com/ 32 32 Long Weekends in 2026 | २०२६ मधील मोठ्या सलग सुट्ट्या https://topicraja.com/long-weekends-in-2026-trip-plan-marathi/ Fri, 09 Jan 2026 11:33:21 +0000 https://topicraja.com/?p=342 Long weekends in २०२६ हे travel lovers साठी, working professionals, students आणि खूप महत्त्वाचे ठरणार…

The post Long Weekends in 2026 | २०२६ मधील मोठ्या सलग सुट्ट्या appeared first on Topic Raja.

]]>
Long weekends in २०२६ हे travel lovers साठी, working professionals, students आणि खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. एखाद्या छोट्या break मिळावा ह्याची वाट पाहत असतो, कारण आपण सगळेच कामाच्या गडबडीत असं धकाधकीच्या जीवनात असतो. Smart plan केल्यास १-२ दिवसांची रजा वापरून अंदाजे ३ ते ५ दिवसांच्या मोठ्या सलग सुट्ट्या enjoy करता येऊ शकतात.

अशावेळी दरवर्षी येणारे Long weekends in २०२६ म्हणजेच २०२६ मधील मोठ्या सलग सुट्ट्या आपल्याला खूपच उपयोगी ठरतात.

चला तर मग, या लेखात आपण २०२६ मधील long weekends, त्यांचे फायदे आणि smart plan कसे करायचे हे पाहणार आहोत.

Long Weekend म्हणजे काय? | What are Long Weekends?

जेव्हा:

  • शनिवार (Saturday) + रविवार (Sunday)
  • आणि त्यात एखादी सार्वजनिक सुट्टी (public holiday) (Friday किंवा Monday) हे तिन्ही एकत्र येतात, तेव्हा तो Long Weekend असतो.

उदाहरणार्थ:

  • शुक्रवार (Friday) holiday + शनिवार (Saturday) + रविवार (Sunday) = 3 days long weekend.
  • जर शुक्रवारी (Friday) सार्वजनिक सुट्टी असेल, तर Friday + Saturday + Sunday = 3 दिवसांची सलग सुट्टी.
  • आणि हीच सुट्टी short trip plan किंवा आरामासाठी perfect असते.

2026 Long Weekends are Important, यांचे महत्व काय आहे?

Long weekends in २०२६ फक्त सुट्टीपुरते मर्यादित नसतात, तर ते तुमच्या lifestyle ला थोडा balance देतात.

✅ Short trip plan करू शकतो,
✅ त्यामुळे कामापासून छोटा break मिळतो,
✅ जास्त leaves न घेता travel करता येतं,
✅ साहजिकच, Office leave balance राहतात,
✅ Personal break, कुटुंब आणि मित्रांसोबत quality time मिळतो,
✅ Stress कमी होतो आणि उत्साह वाढतो,

म्हणूनच बरेच लोकं long weekend आधीच plan करतात.

List of Long Weekends in 2026 (India)

⚠ सूचना: काही सण त्यांची तारीख बदलू शकते.

जानेवारी महिन्यामध्ये सलग सुट्ट्यांचे आठवडे (प्रजासत्ताक दिन)

रविवार ११ १८ २५
सोमवार १२ १९ प्रजासत्ताक दिन२६
मंगळवार १३ २० २७
बुधवार १४ २१ २८
गुरूवार नववर्ष १५ २२ २९
शुक्रवार रजा १६ रजा२३ ३०
शनिवार १० १७ २४ ३१

छान कल्पना : या महिन्यात फिरायला जाण्यासाठी तुमच्याकडे २ संधी आहेत.

पहिला पर्याय : नवीन वर्षाची सुरुवात (४ दिवस)

तारीख : १ जानेवारी (गुरुवार) ते ४ जानेवारी (रविवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : १ जानेवारीला सुट्टी आहे. २ जानेवारीला (शुक्रवार) रजा घ्या.

दुसरा पर्याय : प्रजासत्ताक दिन (४ दिवस)

तारीख : २३ जानेवारी (शुक्रवार) ते २६ जानेवारी (सोमवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : २३ जानेवारी रजा घ्या, २६ जानेवारीला सुट्टी आहे.

 

मार्च महिन्यामध्ये सलग सुट्ट्यांचे आठवडे (होळी, गुढीपाडवा)

रविवार १५ २२ २९
सोमवार होळी १६ २३ ३०
मंगळवार धूलिवंदन १० १७ २४ ३१
बुधवार ११ १८ २५
गुरूवार १२ १९ २६
शुक्रवार १३ २० २७
शनिवार १४ २१ २८

छान कल्पना : मार्च महिन्यात २ मोठे सण येत आहेत. त्या तारखांप्रमाणे सलग सुट्ट्या घेऊन तुम्ही हे सण तुमच्या कुटुंबासोबत किंवा प्रियजनांसोबत साजरे करू शकता.

पहिला पर्याय : पारंपारिक होळी आणि रंगपंचंमीची (४ दिवस)

तारीख : २८ फेब्रुवारी (शनिवार) ते ४ मार्च (बुधवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : होळी २ मार्च, सोमवारी आहे आणि धुळवड ३ मार्च, मंगळवारी आहे. २ मार्च, सोमवारी रजा घ्या.

दुसरा पर्याय : गुढीपाडवा सुट्टी (५ दिवस)

तारीख : १९ मार्च (गुरुवार) ते २२ मार्च (रविवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : १९ मार्च गुरुवारी गुढीपाडवा आहे. २० मार्च, शुक्रवारी रजा घ्या.

 

एप्रिल महिन्या मधील सलग सुट्टीचा कालावधी (गुड फ्रायडेची सुट्टी)

रविवार १२ १९ २६
सोमवार १३ २० २७
मंगळवार १४ २१ २८
बुधवार १५ २२ २९
गुरूवार १६ २३ ३०
शुक्रवार गुडफ्रायडे १० १७ २४
शनिवार ११ १८ २५

छान कल्पना : गुड फ्रायडे मुळे एक दिवस छोटी विश्रांती.

गुड फ्रायडे, शनिवार-रविवार (३ दिवस)

तारीख : ३ एप्रिल (शुक्रवार) ते ५ एप्रिल (रविवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : गुड फ्रायडेची सुट्टी आहे. कोणतीही रजा घेण्याची गरज नाही! फक्त गुरुवारी रात्रीच तुमचं सामान पॅक करा.

 

मे महिन्यामधील सलग सुट्टी: उन्हाळ्यातील सुटका

रविवार ३१ १० १७ २४
सोमवार ११ १८ २५
मंगळवार १२ १९ २६
बुधवार १३ २० २७
गुरूवार १४ २१ २८
शुक्रवार महाराष्ट्र दिन १५ २२ २९
शनिवार १६ २३ ३०

छान कल्पना : महिन्याची सुरुवात long weekwnd ने होत आहे

महाराष्ट्र दिन, शनिवार-रविवार (३ दिवस)

तारीख : १ मे (शुक्रवार) ते ३ मे (रविवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी आहे. रजा घेण्याची गरज नाही! गुरुवार रात्रीसाठी तुमची बॅग पॅक करा.

 

सप्टेंबर मध्ये मोठ्ठया सुट्टीचा आठवडा (गणपती बाप्पाचे आगमन)

रविवार १३ २० २७
सोमवार गणेश चतुर्थी१४ २१ २८
मंगळवार रजा१५ २२ २९
बुधवार रजा१६ २३ ३०
गुरूवार १० रजा१७ २४
शुक्रवार ११ रजा१८ २५
शनिवार १२ १९ २६

छान कल्पना : सप्टेंबर महिना खूपच फायदेशीर आहे.

गणेश चतुर्थीचा शनिवार-रविवार सुट्टीचा आठवडा (३ दिवस)

तारीख : १२ सप्टेंबर (शनिवार) ते १४ सप्टेंबर (सोमवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी आहे. आणि जर १५ सप्टेंबर (मंगळवार) ते १८ सप्टेंबर (शुक्रवार) पर्यंत रजा घेतली तर पूर्ण ९ दिवसांची बाप्पाची सेवा करू शकता.

 

ऑक्टोबर महिन्यामध्ये सलग सुट्ट्यांचे आठवडे (गांधी जयंती आणि दसरा)

रविवार ११ १८ २५
सोमवार १२ रजा१९ २६
मंगळवार १३ दसरा२० २७
बुधवार १४ २१ २८
गुरूवार १५ २२ २९
शुक्रवार गांधी जयंती १६ २३ ३०
शनिवार १० १७ २४ ३१

छान कल्पना : २ सुट्ट्यांची उत्तम संधी आहेत. महिन्याच्या सुरुवातीला एक छोटीशी निसर्गरम्य सहल किंवा दसऱ्याच्या सण तुमच्या कुटुंबासोबत किंवा प्रियजनांसोबत साजरे करू शकता.

पहिला पर्याय : गांधी जयंती (३ दिवस)

तारीख : २ ऑक्टोबर (शुक्रवार) ते ४ ऑक्टोबर (रविवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त सुट्टी आहे. रजा टाकायची गरज नाही! गुरुवार रात्रीच तुमची बॅग पॅक करा.

दुसरा पर्याय : दसरा सण (४ दिवस).

तारीख : १७ ऑक्टोबर (शनिवार) ते २० ऑक्टोबर (मंगळवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : दसरा २० ऑक्टोबर (मंगळवार) रोजी आहे. १९ ऑक्टोबर (सोमवार – महानवमी) रोजी रजा घ्या.

 

डिसेंबर महिन्यामध्ये सलग सुट्टीचा कालावधी

रविवार १३ २० २७
सोमवार १४ २१ २८
मंगळवार १५ २२ २९
बुधवार १६ २३ ३०
गुरूवार १० १७ २४ ३१
शुक्रवार ११ १८ ख्रिसमस२५
शनिवार १२ १९ २६

छान कल्पना : नाताळ (२५ डिसेंबर) शुक्रवारी येत आहे, ज्यामुळे वर्षाचा शानदार समारोप करण्यासाठी नैसर्गिकरित्या तीन दिवसांची सुट्टी मिळते.

ख्रिसमस आणि शनिवार-रविवार (४ दिवस)

तारीख : २५ डिसेंबर (शुक्रवार) – २७ डिसेंबर (रविवार)
मोठ्या सुट्टीचा आठवडा : २५ डिसेंबर (शुक्रवार) सुट्टी आहे. रजा घेण्याची गरज नाही! किंवा २४ डिसेंबरला (गुरुवार) रजा घेऊन long weekend चा plan करू शकता.

आता पाहुयात वरील Long Weekends in २०२६ वापरून plan कसं करू शकाल?

Smart planning tips वापरून विचार केलात तर long weekends चा पूर्ण फायदा घेता येतो.

📅 २०२६ सालासाठी लांब सुट्ट्या असलेले सुट्टीचे कॅलेंडर तयार करा.
🧠 Long weekends सोबत १-२ paid leaves एकत्र करा.
🗺 जवळच्या ठिकाणांना प्राधान्य द्या (२-५ तासांचा प्रवास).
✈ प्रवासाचे बुकिंग आधीच करून ठेवा (विमान + हॉटेल), यामुळे कमी खर्चात जास्त enjoyment मिळतो.

FAQs on Long Weekends in २०२६

२०२६ मध्ये किती long weekends आहेत?
→ ही संख्या state holidays वर अवलंबून असते, पण अनेक ३-४ दिवसांचे सलग मोठी सुट्टी मिळू शकते.

सगळ्या राज्यांसाठी long weekends same असतात का?
→ नाही, National holidays same असतात, पण state holidays वेगवेगळे असतात.

२०२६ मध्ये travel साठी best long weekends कोणते?
→ January, May, October आणि December हे महिने जास्त favourable आहेत.

Conclusion: 2026 मधील Long Weekends चा पूर्ण फायदा घ्या

Long weekends in २०२६ योग्य planning केल्यास तुमचं work-life balance खूप improve करू शकतात.
आधीच calendar mark करा, leaves smartly वापरा आणि २०२६ मधील मोठ्या सलग सुट्ट्या पूर्णपणे enjoy करा 🌿

The post Long Weekends in 2026 | २०२६ मधील मोठ्या सलग सुट्ट्या appeared first on Topic Raja.

]]>
महाराष्ट्र सरकारची २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | Maharashtra govt public holidays in 2026 https://topicraja.com/maharashtra-govt-declared-public-holidays-in-2026/ Sat, 03 Jan 2026 14:57:32 +0000 https://topicraja.com/?p=267 महाराष्ट्र सरकारची २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | Maharashtra govt public holidays in 2026 च्या…

The post महाराष्ट्र सरकारची २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | Maharashtra govt public holidays in 2026 appeared first on Topic Raja.

]]>
महाराष्ट्र सरकारची २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | Maharashtra govt public holidays in 2026 च्या सुट्ट्या आधीच माहित असतील तर प्रवासाचे नियोजन, कौटुंबिक कार्यक्रम आणि वैयक्तिक कामे अधिक सोप्या पद्धतीने ठरवता येतात. या लेखात आपण २०२६ मधील प्रमुख राष्ट्रीय, धार्मिक आणि सांस्कृतिक सुट्ट्यांची माहिती पाहणार आहोत. भारतामध्ये सण, उत्सव आणि राष्ट्रीय दिवसांना विशेष महत्त्व आहे.

या लेखामध्ये २०२६ मधील महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांची संपूर्ण माहिती, महत्त्वाच्या सुट्ट्या आणि नियोजनासाठी उपयोगी टिप्स मिळतील.

महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्टी म्हणजे काय? Maharashtra public holidays means…?

जाहीर केलेल्या यादीचं वर्गीकरण खाली नमूद केली आहे, त्या प्रमाणे लागू होते.

  • सरकारी कार्यालये
  • शाळा व कॉलेज
  • बँका (Bank Holidays)
  • काही खासगी संस्था

Maharashtra holiday list 2026 सुट्ट्यांचे नियोजन का महत्त्वाचे आहे?

जर तुम्हाला Maharashtra holiday list 2026 यादी आधीच माहित असेल तर :

  • Yearly planning साठी उपयुक्त,
  • Long weekends चे plan करता येतात,
  • Travel plans आणि vacations साठी मदत,
  • सण साजरे करण्याची तयारी वेळेत करता येते,
  • Exams, Events आणि Office schedule ठरवण्यासाठी,
  • Business आणि banking कामकाजाचे नियोजन.

ही माहिती प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हा लेख सेव्ह करा आणि आपल्या मित्र–परिवारासोबत शेअर करा.

२०२६ मधील प्रमुख सुट्ट्या Maharashtra Holidays 2026 (Date-wise)

Holiday Public Holiday महिन्याची तारीख आणि वार
जानेवारी
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ सोमवार
फेब्रुवारी
महाशिवरात्री १५ फेब्रुवारी २०२६ रविवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार
मार्च
होळी (दुसरा दिवस) ०३ मार्च २०२६ मंगळवार
गुढी पाडवा १९ मार्च २०२६ गुरुवार
रमजान-ईद (ईद अल-फित्र) २१ मार्च २०२६ शनिवार
राम नवमी २६ मार्च २०२६ गुरुवार
महावीर जन्मकल्याणक ३१ मार्च २०२६ मंगळवार
एप्रिल
गुड फ्रायडे ०३ एप्रिल २०२६ शुक्रवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२६ मंगळवार
मे
महाराष्ट्र दिन ०१ मे २०२६ शुक्रवार
बुद्ध पौर्णिमा ०१ मे २०२६ शुक्रवार
बकरीद (ईद-उल-जुहा) २८ मे २०२६ गुरुवार
जून
मोहरम २६ जून २०२६ शुक्रवार
ऑगस्ट
स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२६ शनिवार
पारशी नववर्ष (शहानशाही) १५ ऑगस्ट २०२६ शनिवार
ईद-ए-मिलाद २६ ऑगस्ट २०२६ बुधवार
सप्टेंबर
गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६ सोमवार
ऑक्टोबर
महात्मा गांधी जयंती ०२ ऑक्टोबर २०२६ शुक्रवार
दसरा २० ऑक्टोबर २०२६ मंगळवार
नोव्हेंबर
दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) ८ नोव्हेंबर २०२६ रविवार
दिवाळी (बळी प्रतिपदा) १० नोव्हेंबर २०२६ मंगळवार
गुरु नानक जयंती २४ नोव्हेंबर २०२६ मंगळवार
डिसेंबर
नाताळ २५ डिसेंबर २०२६ शुक्रवार
२०२६ मधील प्रमुख सुट्ट्या Maharashtra Holidays 2026 (Date-wise)

 

Long Weekends in 2026 बद्दल जाणून घेण्यासाठी खालील link वर click करा

महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्टी २०२६ – प्रकार

राष्ट्रीय सुट्ट्या (National Holidays)

भारतभर लागू असलेल्या राष्ट्रीय सुट्ट्या:

  • प्रजासत्ताक दिन (Republic Day)
  • स्वातंत्र्य दिन (Independence Day)
  • गांधी जयंती (Gandhi Jayanti)

राज्यस्तरीय सार्वजनिक सुट्ट्या (State Public Holidays)

या सुट्ट्या विशेषतः Maharashtra Government Holidays म्हणून ओळखल्या जातात:

  • महाराष्ट्र दिन
  • शिवजयंती
  • गणेश चतुर्थी
  • दिवाळी

सण आणि उत्सवांच्या सुट्ट्या (Festival Holidays)

  • गुढी पाडवा
  • होळी
  • दसरा
  • ईद
  • ख्रिसमस (Christmas)

Maharashtra Government Holidays २०२६ कोणासाठी लागू असतात?

ही सुट्टी यादी लागू असते:

  • राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी
  • सार्वजनिक उपक्रम (PSU)
  • शाळा, कॉलेज, Universities
  • बँका (Some holidays RBI norms नुसार)

⚠ टीप: काही Private companies मध्ये सुट्ट्या वेगळ्या असू शकतात.

महाराष्ट्र सुट्टी यादी २०२६ कशी वापरावी?

  • Calendar मध्ये सर्व Public Holidays mark करा
  • Long weekend planning करा
  • Important office deadlines adjust करा
  • Family functions आणि travel plan करा

Frequently Asked Questions – FAQ
Maharashtra public holidays in 2026

❓ २०२६ मध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्टी ( Public Holidays ) किती?

👉 साधारणपणे 25 ते 30 सार्वजनिक सुट्ट्या ( Public Holidays ) असून त्यात National, State आणि Festival Holidays समाविष्ट आहेत.

❓ बँक सुट्ट्या ( Bank Holidays ) आणि सरकारी सुट्ट्या ( Public Holidays ) वेगळ्या असतात का?

👉 होय. Bank Holidays RBI च्या नियमांनुसार फक्त बँकसाठी असतात आणि काही financial institutions साठी असतात, काही सुट्ट्या वेगळ्या असू शकतात. तर Public Holidays सर्व सरकारी कार्यालये आणि शाळांसाठी लागू होतात.

❓ Private company साठी ही सुट्टी यादी लागू आहे का?

👉 पूर्णपणे नाही. Private companies त्यांच्या policy नुसार सुट्ट्या देतात.

❓ Maharashtra Holiday List 2026 official कधी जाहीर होते?

👉 साधारणपणे मागील वर्षाच्या शेवटी किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला जाहीर केली जाते.

डिस्क्लेमर : “महाराष्ट्र सरकारची २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | Maharashtra govt public holidays in 2026” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post महाराष्ट्र सरकारची २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी | Maharashtra govt public holidays in 2026 appeared first on Topic Raja.

]]>
Chaitra navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी https://topicraja.com/chaitra-navratri-2025-dates-shubh-muhurat-maa-durga-puja-vidhi/ Mon, 22 Sep 2025 06:49:17 +0000 https://topicraja.com/?p=186 Navratri 2025 : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी शारदीय नवरात्रला २२…

The post Chaitra navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी appeared first on Topic Raja.

]]>
Navratri 2025 : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी शारदीय नवरात्रला २२ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. नवरात्र २०२५ सोमवारी 22 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 02 ऑक्टोबर रोजी गुरुवारी विजययदशामी उत्सवासह समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, २०२५ यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.

नवरात्र पूजा याबाबतची माहिती आज आम्ही Topic raja डॉट कॉम या वेब पेजद्वारे घेऊन आलो आहोत. तर चला मग, पाहुयात नवरात्र.

नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी

सणनवरात्र
घटस्थापना मुहूर्त२२ सप्टेंबर २०२५, सोमवार.
सकाळी ०६ वाजून १९ मिनटे ते १० वाजून १९ मिनटे
नवरात्रि चा शुभारंभ२२ सप्टेंबर २०२५, सोमवार.
ईष्ट देवतादुर्गा देवी
दसरा०२ ऑक्टोबर २०२५, गुरुवार.

नवरात्री २०२५ तिथि – Navratri 2025 Dates

दिवस आणि तारीखसणतिथि
२२ सप्टेंबर २०२५, सोमवारघटस्थापना, शैलपुत्री पूजाप्रतिपदा
२३ सप्टेंबर २०२५, मंगळवारब्रह्मचारिणी पूजाद्वितीया
२४ सप्टेंबर २०२५, बुधवारचंद्रघंटा पूजात्रितिया
२५ सप्टेंबर २०२५, गुरुवारकुष्मांडा पूजाचतुर्थी
२६ सप्टेंबर २०२५, शुक्रवारस्कंदमाता पूजापंचमी
२७ सप्टेंबर २०२५, शनिवारकात्यायनी पूजाषष्टी
२८ सप्टेंबर २०२५, रविवारकालरात्री पूजासप्तमी
२९ सप्टेंबर २०२५, सोमवारमहागौरी पूजाअष्टमी
३० सप्टेंबर २०२५, मंगळवारसिद्धीदात्रीनवमी
०२ ऑक्टोबर २०२५, बुधवारविजयादशमी, शस्त्रपूजा, दसरादशमी

डिस्क्लेमर : “Navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post Chaitra navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी appeared first on Topic Raja.

]]>
Sukhkarta Dukhharta lyrics in marathi – सुखकर्ता दुखहर्ता https://topicraja.com/sukhkarta-dukhharta-varta-vighnachi-ganpati-aarti/ Mon, 14 Jul 2025 14:30:59 +0000 https://www.topicraja.com/?p=105 Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi Ganesh Aarti…

The post Sukhkarta Dukhharta lyrics in marathi – सुखकर्ता दुखहर्ता appeared first on Topic Raja.

]]>
Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi Ganesh Aarti

॥ गणपतीची आरती ॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव || ०१ ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०२॥

लंबोदर पितांबर फणिवरवंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०३॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शेंदुर लाल चढ़ायो ॥

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे ना जाय लागत हूं पदको ॥०१॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी |
विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी |
कोटि सूरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
गंड-स्थल मदमस्तक झूले शशिबहरी ॥०२॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥०३॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

पारंपारिक कार्यक्रम

Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi

The post Sukhkarta Dukhharta lyrics in marathi – सुखकर्ता दुखहर्ता appeared first on Topic Raja.

]]>
मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी https://topicraja.com/what-are-tourist-places-to-visit-in-mumbai-and-things-to-do/ Mon, 14 Jul 2025 14:26:28 +0000 https://www.topicraja.com/?p=99 मुंबईत भेट देण्यासाठी कोणती पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, हे आपण ह्या लेखातून…

The post मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
मुंबईत भेट देण्यासाठी कोणती पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, हे आपण ह्या लेखातून पाहणार आहोत.

एक भव्य आणि रोमांचक शहर म्हणजे मुंबई. इथे आपल्याला अनेक प्रकारची ठिकाणे तसेच विविध प्रकारची लोक पाहायला मिळतात. जर तुम्ही  मुंबईला भेट देण्याची योजना आखत असाल, तर “मुंबईतील आवश्यक खाण्याची ठिकाणे” हा लेख नक्की वाचा.

मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी

स्रोत: पिंटरेस्ट

#१. गेटवे ऑफ इंडिया


#२: मुंबईचे लोकप्रिय समुद्रकिनारे गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी


#३: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान


#४ प्रसिद्ध मंदिर : सिद्धिविनायक मंदिर आणि मुंबा देवी मंदिर


#५ : नेहरू तारांगण



#६ : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय


#७ : मुंबईतील खरेदी – कुलाबा कॉजवे


#८ : वानखेडे स्टेडियम


#९ : क्रॉफर्ड मार्केट


#१० : हँगिंग गार्डन्स


#११ : ग्लोबल विपश्यना पॅगोडा


मुंबईत करण्यासारख्या गोष्टी

#१ : एलिफंटा लेण्यांकडे फेरी राईड

#२ : मरीन ड्राइव्हवर सूर्यास्त

#३ : वांद्रे – वरळी सी लिंकवर गाडी चालवा

#४ : फिल्म सिटीला भेट


पर्यटनाबद्दल अधिक माहिती साठी इथे वाचा

डिस्क्लेमर : “मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post मुंबईत भेट देण्यासाठी पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी https://topicraja.com/shirdi-sai-baba-mandir-important-things-to-know/ Mon, 14 Jul 2025 14:19:42 +0000 https://www.topicraja.com/?p=90 शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी, आपण आज ह्या लेखातून पाहणार आहोत. Shirdi…

The post शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी, आपण आज ह्या लेखातून पाहणार आहोत. Shirdi Sai Baba Mandir – शिर्डी साई बाबा मंदिर महाराष्ट्रातील संतभूमी ‘शिर्डी.

Shirdi Sai Baba Temple - shirdi sai baba mandir - शिरडी वाले साईं बाबा मंदिर, माझा अनुभव

Shirdi Sai Baba Mandir

महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह साईबाबा यांचे लाखो अनुयायी आज देशभर पसरले आहेत. साईबाबा हे महाराष्ट्रातील एक महान योगी व आध्यात्मिक गुरु मानले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी साईबाबांची विविध प्रकारची मंदिरे आपल्याला पहायला मिळतात, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे असणार्‍या साईबाबांच्या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, साईबाबा जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा ते फक्त 16 वर्षांचे होते. नंतर ते शिर्डीमध्येच राहू लागले आणि 1918 मध्ये साईबाबांनी शिर्डीमध्ये समाधी घेतली. त्यांच्या विनंतीनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर गावकर्‍यांनी त्यांचे पार्थिव एका निश्चित ठिकाणी पुरले आणि त्यावर समाधी मंदिर बांधले. 1954मध्ये समाधीशेजारी बसलेल्या स्थितीत साईबाबांची संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हे घर संतांसाठी विश्रामगृह म्हणून वापरले जात होते आणि ते नागपुरातील कोट्यधीश गोपाळराव बुटी यांनी बांधले होते.

शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्टतर्फे मंदिरातील सर्व व्यवस्था पाहिली जाते. या अनोख्या साईमंदिराला दर दिवशी हजारो भक्त भेटी देतात. चला तर मग जाणून घेऊया शिर्डीबद्दलची थोडी माहिती…

मुंबईपासून 300 किमी अंतरावर साईबाबांचे हे मंदिर आहे.

कसे पोहोचायचे शिरडीला (How to Reach Shirdi)

  • मुंबई ते शिर्डी रेल्वे किंवा खासगी बसने जाता येते
  • मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस (vande bharat express)
  • दादर – साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाडमार्गेही जाता येते.
  • मुलुंड आणि ठाणे रेल्वेस्टेशनच्या बाहेरूनही खासगी कंपनीच्या बसेस शिर्डीला जाण्यासाठी सुटतात.
  • मुंबई ते नाशिक रेल्वे आणि नंतर खासगी बसने शिर्डीपर्यंत पोहोचता येते.

शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर 28 मे 1923 रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज 2019 साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.

शिर्डीत कुठे मुक्काम करावा (Where to Stay In Shirdi)

पिकनिकला जाताना आपण नेहमीच किती किंमतीत चांगल्या सोयीसुविधा असणारी ठिकाणी शोधत असतो. शिर्डीला साई संस्थानामार्फत अगदी माफक दरात भक्तांसाठी भक्तनिवास उपलब्ध करण्यात आले आहेत. येथील रूम बुकिंग (shirdi room booking) सेवाही अगदी सहज सोपी आहे.

  • द्वारावती भक्तनिवास ( Dwaravati Bhaktniwas – ३३४ रूम )
  • साईबाबा भक्तनिवासस्थान ( Saibaba Bhaktaniwassthan – ५४२ रूम )
  • साईआश्रम भक्तनिवास ( Saiashram Bhaktniwas – १५३६ रूम )
द्वारावती भक्तनिवास - Dwaravati Bhaktniwas
द्वारावती भक्तनिवास – Dwaravati Bhaktniwas
साईबाबा भक्तनिवासस्थान - Saibaba Bhaktaniwassthan
साईबाबा भक्तनिवासस्थान – Saibaba Bhaktaniwassthan
साईआश्रम भक्तनिवास - Saiashram Bhaktniwas
साईआश्रम भक्तनिवास – Saiashram Bhaktniwas

रूम बुकिंग कसे करावे (Shirdi sansthan room booking)

अशाप्रकारचे तीन पर्याय मिळतात. रूम बुकिंग फक्त room booking online करावे लागते. येथे counter बुकिंग करता येत नाही आहे.

Shirdi Sai Baba Mandir – शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

Sai baba darshan

श्रीसाईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भक्तगण येत असतात. असे असले तरीदेखील प्रत्येक जण रांगेत उभे राहून शिस्तीत साईबाबांचे दर्शन घेतो.

श्री साईबाबा मंदिरातील आरतीच्या वेळा:

  • भूपाली आरती- 4:15 बजे (At Morning)
  • काकड़ आरती- 4:30 (At Morning)
  • मध्यान आरती- 12:00 बजे (At Noon)
  • धूप आरती- सूर्यास्तानंतर (At Evening)
  • सेज आरती- 10:30 बजे (At Night)

दर गुरुवारी साईबाबांची पालखी निघते. साईबाबा मंदिर ते दवराक्मी आणि रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान परत मंदिरात पालखी येते. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होते.

दररोज नित्यनियमाने साईबाबांच्या मंदिरात बाबांची आरती होते. त्यानंतर पूजा व अभिषेक केला जातो. याव्यतिरिक्त साई मंदिरात संपूर्ण वर्षभरात अनेक कार्यक्रम भक्तगणाकडून राबविले जातात. साई बाबांची जी मूर्ती आहे ती अतिशय मनमोहक व सुंदर आहे. त्यांची मूर्ती बघितल्यानंतर भक्तगणांच्या मनाला शांती व आनंद लाभतो.

चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय – Sai Baba Sansthan canteen

प्रत्येक भक्तनिवासामध्ये कँटीन आहे, जिथे सकाळचा नाश्ता करू शकतो, पण दुपारी व रात्री जेवणासाठी भोजनालयात जावे लागते, जे मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे.

Prasadalaya Shirdi , Saibaba Mandir
Prasadalaya Shirdi , Saibaba Mandir

शिर्डीमध्ये भेट देण्याची महत्त्वाची ठिकाणे

  • शिर्डी साई बाबा मंदिर – Shirdi Sai Baba Temple
  • शनी शिंगणापूर – Shani Shingnapur
  • हनुमान मंदिर / मारुती मंदिर – Hanuman Mandir / Maruti Mandir
  • द्वारकामाई – Dwarkamai
  • बाबा चावडी – Baba Chavadi

शिर्डीला जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ (Best Time To Go Shirdi)

शिर्डीला केव्हाही भेट देता येते. धार्मिक स्थळ असल्याने कोणत्याही विशेष प्रसंगी येथे मोठी गर्दी असते. विशेषत: उन्हाळ्याच्या सुटीत येथे मोठी गर्दी असते. शिर्डीला जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. याशिवाय सोमवार आणि शुक्रवारीही मंदिरात कमी गर्दी असते.

शिर्डीत कोणत्या गोष्टी करणे टाळावे (Things to avoid in Shirdi)

  • मोबाईल, कॅमेरा दर्शनाला जाताना नेऊ नये.
  • भक्तगणांचे मोबाइल ठेवण्यासाठी संस्थानातर्फे सोय करण्यात आली आहे.चपल स्टँडप्रमाणे मोबाईल व कॅमेरा जमा करून आपण पावती घेऊ शकतो.

साईबाबांना समाधी घेऊन 100 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत पण साईबाबांना समाधी घेणे अगोदरपासून काही लोक त्यांना आपले गुरु मानत. ज्यांना आध्यात्माची आवड आहे त्यांच्यासाठी साईबाबा सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहे. साईबाबांनी हिंदू व मुस्लिम समाजाला एक करण्यासाठी काम केले. त्यामुळेच आजच्या घडीला सर्व धर्माचे लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. साईबाबांच्या शिर्डीला गुरुवारचे खूप महत्त्व आहे. या दिवशी साईबाबांच्या शिर्डीला मोठ्या संख्येने भक्तगण साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावत असतात.

नक्की वाचा :- Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

Shirdi Sai Baba Mandir important things to know – शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

The post शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी appeared first on Topic Raja.

]]>
Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे https://topicraja.com/tarkarli-beach-things-to-do/ Mon, 14 Jul 2025 14:17:16 +0000 https://www.topicraja.com/?p=86 Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे हा पर्यटकांचा कोकणातील फेमस पिकनिक…

The post Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे appeared first on Topic Raja.

]]>
Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे हा पर्यटकांचा कोकणातील फेमस पिकनिक स्पॉट आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात समुद्रकिनारी तारकर्ली गाव वसले आहे. तारकर्ली पर्यटन स्थळे चला तर या लेखात आपण पाहूया तारकर्ली बीचवर आणि बीचजवळ करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टी काय आहेत.

चला पाहूया तारकर्ली बीचवर आणि बीच जवळ करू शकणार्‍या सर्वोत्तम गोष्टी काय आहेत.

तारकर्ली बीचबद्दल माहिती

ठिकाण :- तारकर्ली, मालवण, सिंधूदुर्ग
मुंबईपासून अंतर :- 490 किमी
पोहचण्याचे मार्ग मालवणला पोहोचण्यासाठी तीन रेल्वेस्टेशन आहेत.
कणकवली, सिंधुदूर्ग (ओरोस) आणि कुडाळ.

कणकवली रेल्वेस्टेशनहुन जाण्यासाठी :-

Auto ने कणकवली रेल्वे स्टेशन ते एसटी डेपो,
त्यानंतर कणकवली ते मालवण ( ४५ किलोमीटर ) एसटीने मग मालवण ते तारकर्लीला जाणारी एसटी.
किंवा सकाळच्या वेळी कणकवली डेपोसमोरून मालवणला जाण्यासाठी प्रायव्हेट कंपनीच्या बसेसही आहेत, त्याने मालवणला वा तारकर्लीला पोहोचू शकतो.

सिंधुदुर्ग (ओरोस) रेल्वेस्टेशनवरून जाण्यासाठी :-

रेल्वेस्टेशनच्या बाहेरून मालवणला ( २६ किलोमीटर ) जाणारी एसटी पकडू शकतो.
किंवा स्टेशनपासून काही एक किलोमीटर वर रानबांबुळी ह्या एसटीबस थांब्याहुन मालवणकडे जाणार एसटीने जाऊ शकतो.

कुडाळ रेल्वेस्टेशनहुन जाण्यासाठी :-

Auto करून कुडाळ रेल्वे स्टेशन ते एसटी डेपो,
मग कुडाळ ते मालवण ( २८ किलोमीटर ) एसटीने प्रवास करू शकतो.

मुंबई- गोवा हायवेने जायचे असेल तर मुंबईहूनही प्रायव्हेट कंपनीच्या बसेसचा पर्याय आहे. या बसेस सायन-वाशीमार्गे मालवण किंवा बोरिवली, भांडुप, ठाणेमार्गे मालवण अशा जातात.

मालवण शहराच्या दक्षिणेला 7 किमी अंतरावर तारकर्ली गाव आहे. या ठिकाणी कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम आहे. तारकर्ली बीचला जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणूनही मान्यता मिळाली आहे. येथे बांबूची आणि सुपारीची झाडे आहेत. येथील गावपण आणि शांतता पर्यटकांना कायमच भावते.

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

  • पहिला दिवस

    • तारकर्ली बीच,
    • देवबाग बीच,
    • जय गणेश मंदिर.
  • दुसरा दिवस

    • Snorkeling,
    • Scuba Diving,
    • Parasailing,
    • त्सुनामी आयलंड,
    • तारकर्ली – देवबाग येथील बीचवर वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहेत. या ठिकाणी डॉल्फीन दिसतात. water sports packages कमी किमतीत मिळतील.
  • तिसरा दिवस

    • सिंधुदुर्ग किल्ला,
    • रॉक गार्डन (या गार्डनचे वैशिष्ट्य म्हणजे मालवण शहरापासून जवळच खडकामध्ये उभारलेले गार्डन आहे. येथे असलेले लायटिंगचे कारंजे विशेष आकर्षण आहे. Selfie साठी उत्तम spot आहे.)

तारकर्ली बीचजवळ भेट देण्यासारखी सर्वोत्तम ठिकाणे

Tarkarli Beach

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

Snorkeling

Tarkarli Snorkeling

Scuba Diving

Tarkarli Scuba Diving

Parasailing

Parasailing

Sindhudurg Fort

Sindhudurg Fort

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी

तारकर्लीजवळची पर्यटनस्थळे:- ( हे स्पॉट पाहण्यासाठी two wheeler भाडे स्वरूपात उपलब्ध आहेत. )

मालवण, देवबाग, तारकर्लीमध्ये हॉटेल आणि निवासाचीही उत्तम व्यवस्था:-

येथे MTDC चे रिसार्ट आहेत, सुरुच्या बनात असलेले rooms असून मोफत parkingची सोय आहे. आहेत, त्यामुळे याठिकाणी राहणे पर्यटक पसंत करतात.

  • MTDC resort Malvan,
  • MTDC – Tarkarli Resort,
  • MTDC – Devbag Resort.

याशिवाय जर घरगुती राहण्याची व जेवणाची सोय हवी असेल तरी तीदेखील उत्तमप्रकारे उपलब्ध आहे.

  • Chintamani resort tarkarli – रुम्स, नाश्ता आणि जेवण,
  • Sea view resort tarkarli – रुम्स, जेवणाची सोय,
  • Gajanan resort tarkarli – रुम्स, नाश्ता, जेवणाची सोय,
  • Nirmala beach stay malvan – नाश्ता, शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय, रुचकर जेवण, एकदा तरी try केलेच पाहिजे.

Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे

The post Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे appeared first on Topic Raja.

]]>
मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name https://topicraja.com/marathi-mahine-list-marathi-months-name/ Sun, 13 Jul 2025 16:10:00 +0000 https://www.topicraja.com/?p=52 मराठी दिनदर्शिकानुसार मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name आणि त्यांचे महत्व या विषयीची…

The post मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name appeared first on Topic Raja.

]]>
मराठी दिनदर्शिकानुसार मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name आणि त्यांचे महत्व या विषयीची संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

इंग्रजी दिनदर्शिकानुसार १२ महिने असतात, आणि या महिन्यांमध्ये मराठी महिन्यांचा कालावधी तसेच या दरम्यान येणाऱ्या सणांची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

कॅलेंडरच्या या महिन्यांचा प्रत्येक भाग आपल्या मराठी संस्कृतीत अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे Marathi Mahine Names चा अभ्यास आपल्याला अधिक चांगली समज मिळवून देतो.

मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name

आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि,

१) Marathi Mahine मराठी महिने कोणते आहेत?
२) त्यांची नावे काय आहेत?
३) या महिन्या मध्ये कोणकोणते सण येतात?
४) आणि ह्या सणांचं महत्व काय आहे?

मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name

मराठी महिने इंग्रजी महिने
चैत्र मार्च आणि एप्रिल
वैशाख एप्रिल आणि मे
ज्येष्ठ मे, जून आणि जुलै
आषाढ जुलै आणि ऑगस्ट
श्रावण ऑगस्ट आणि सप्टेंबर
भाद्रपद सप्टेंबर आणि ऑक्टोबर
आश्विन ऑक्टोबर आणि नोव्हेंबर
कार्तिक नोव्हेंबर आणि डिसेंबर
मार्गशीर्ष डिसेंबर आणि जानेवारी
पौष जानेवारी आणि फेब्रुवारी
माघ फेब्रुवारी आणि मार्च
फाल्गुन मार्च आणि एप्रिल

वरील माहिती ही २०२६ ह्या इंग्लिश आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे आहे,

Long Weekends in 2026 बद्दल जाणून घेण्यासाठी खालील link वर click करा

मराठी महिने त्यांची नावे, मराठी महिने यादी व मराठी महिन्यांची नावे | Marathi mahine list | Marathi months name | Marathi mahine name.

  • चैत्र,
  • वैशाख,
  • ज्येष्ठ,
  • आषाढ,
  • श्रावण,
  • भाद्रपद,
  • आश्विन,
  • कार्तिक,
  • मार्गशीर्ष,
  • पौष,
  • माघ,
  • फाल्गुन.

चैत्र (Chaitra) – नववर्ष आरंभ

मराठी दिनदर्शिकेतील आणि मराठी वर्षातील पहिला महिना म्हणजे चैत्र म्हणून ओळखला जातो, ह्या महिन्याची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा पासून होतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार मार्च आणि एप्रिलच्या दरम्याने हा महिना येतो. चैत्रतचं मराठी नववर्षाची सुरुवात होते, म्हणून ह्याच महिन्यात गुढीपाडवा तसेच प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस रामनवमी हे सण साजरे केले जातात. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांसाठी चैत्र महिना पिकांची लागवड आणि कृषी कामकाजासाठी आदर्श मानला जातो.

महत्वाचे दिवस :-
१) गुढीपाडवा (साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त),
२) श्री राम जन्मदिन – रामनवमी,
३) भगवान महावीर जयंती,
४) हनुमान जन्मोत्सव (हनुमान जयंती.),
५) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती.

वैशाख (Vaishakha) – उबदार वातावरण

मराठी वर्षातला दुसरा महिना म्हणजे वैशाख. इंग्रजी कॅलेंडरनुसार एप्रिल आणि मे ह्या महिन्यांदरम्यान असतो. हा उन्हाळ्याचा महिना आहे. महिन्याच्या मध्यावर विविध सण व उत्सव साजरे होतात, आणि शेतकरी जीवनशैलीला जागृत करणारे कार्य यामध्ये असतात.

महत्वाचे दिवस :-
१) अक्षय तृतीया, . २) महाराष्ट्र दिन, . ३) बुद्धपौर्णिमा.

ज्येष्ठ (Jyeshtha) – पावसाची चाहूल

मराठी वर्षानुसार तिसऱ्या क्रमांकाचा ज्येष्ठ हा महिना आला आहे. पण २०२६ ह्या वर्षी इंग्लिश कॅलेंडरनुसार ज्येष्ठ (अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ) हा महिना मे, जून आणि जुलै दरम्यान आला आहे. ह्याच महिन्यात पावसाची चाहूल लागते. ह्या काळात विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे.

महत्वाचे दिवस :- १) वटपौर्णिमा

आषाढ (Ashadha) – अधिक जोरात पाऊस आणि महत्त्वपूर्ण सण

आता वर्षातला चौथा महिना म्हणजे आषाढ पाहुयात. इंग्लिश कॅलेंडरच्या जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान आषाढचा कालावधी आहे. महिन्यात पाऊस अधिक जोरात सुरू होतो.
वर्षातील येणाऱ्या एकादशींपैकी एक आषाढी एकादशी ह्या महिन्यात असते, अनेक विठ्ठलाचे भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल – रुख्मिणीच्या दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या वारीला जातात.
भारतीय संस्कृतीत गुरूंचा आदर केला जातो आणि गुरूंना मानवंदना म्हणून ह्याच महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते

महत्वाचे दिवस :-
१) देवशयनी आषाढी एकादशी, २) गुरु पौर्णिमा

श्रावण (Shravana) – श्रावण आणि पावसाळा

श्रावण हा पाचवा महिना असतो, इंगजी कॅलेंडरप्रमाणे, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दरम्याने आला आहे.
धार्मिक आणि पारंपारिक दृष्टिकोनातून श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शिवरात्री आणि नागपंचमी यासारखे सण यामध्ये येतात. भारताचा स्वतंत्र दिन हा ह्या महिन्याच्या १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
ह्या महिन्यातही भरपूर पाऊस पडत असतो, म्हणूनच शेतकऱ्यांसाठी पावसाळ्याच्या काळात हा महिना महत्त्वपूर्ण ठरतो.

महत्वाचे दिवस :-
१) स्वातंत्र दिन,
२) नागपंचमी,
३) नारळी पौर्णिमा,
४) रक्षाबंधन,
५) श्रीकृष्ण जयंती,
६) गोकुळाष्ठमी (गोपाळकाला),
७) बैलपोळा.

भाद्रपद (Bhadrapada) – दृष्य उत्सव

हा वर्षातला सहावा महिना भाद्रपद. इंग्रजी दिनदर्शिकानुसार सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दरम्याने भाद्रपदचा कालावधी आहे.
लहान – थोरांच्या आवडीचा लाडक्या गणपती बाप्पाचे ( गणेश चतुर्थी ) आगमन भाद्रपद महिन्यात होते.

महत्वाचे दिवस :-
१) हरितालिका तृतीया, श्रीगणेश चतुर्थी,
२) ऋषिपंचमी,
३) अनंत चतुर्थी,
४) महात्मा गांधी जयंती.

आश्विन (Ashwayuja) – आश्वयुज आणि शरद ऋतू

आश्विन हा ह्या वर्षातला सातवा आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्याने आला आहे.
घटस्थापनापासून आश्विन महिन्याची सुरुवात होत आहे. म्हणजेच, दुर्गा पूजा, नवरात्रि, दसरा आणि दिवाळी यांसारखे मोठे सण होणार आहेत. यामध्ये विशेषतः महिलांसाठी पूजाअर्चा आणि व्रत यांचा महत्त्वपूर्ण भाग असतो, परंपरेनुसार देवीची पूजा केली जाते. ह्याच महिन्यात आपल्या संस्कृतीप्रमाणे दसराच्या दिवशी हत्यारांची पूजा करण्याची प्रथा आहे.

महत्वाचे दिवस :-
१) घटस्थापना,
२) दसरा,
३) कोजागिरी पॊर्णिमा,
४) धनत्रयोदशी,
५) नरक चतुर्थी,
६) लक्ष्मीपूजन.

कार्तिक (Kartika)

वर्षातला पुढचा महिना कार्तिक हा आठवा आहे, इंग्रजी दिनदर्शिकानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्याने आहे.
बलिप्रतिपदा आणि दीपावली पडावा ह्या दिवाळीच्या दिवसापासून कार्तिक महिन्याची सुरुवात होत आहे, यामध्ये घराघरात दिवे लावून सजावट केली जाते आणि विविध सणांचे आयोजन होतात.

महत्वाचे दिवस :-
१) बलिप्रतिपदा, दीपावली पडावा,
२) भाऊबीज,
३) कार्तिकी पौर्णिमा, गुरु नानक जयंती.

मार्गशीर्ष (Margashirsha) – नवा उत्साह

मार्गशीर्ष हा वर्षातला नववा महिना आहे, तसेच इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्याने मार्गशीर्षचा कालावधी असतो.
मार्गशीर्ष महिना साधना आणि ध्यान याचा महत्त्वाचा महिना आहे. यामध्ये संत निवृत्तीनाथ पूजा आणि इतर आध्यात्मिक कार्ये होतात. ही काळ तंत्र व साधना महत्त्वाची मानली जाते.

महत्वाचे दिवस :- १) श्रीदत्त जयंती

पौष (Paush)

पौष हा वर्षातला दहावा महिना. इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्याने पौषचा कालावधी आहे. तसेच इंग्रजी कॅलेंडर इयरनुसार ह्या महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात होते.
भारताचा गणतंत्र दिन ह्या महिन्यात २६ जानेवारीला असतो. मकर संक्रांती यासारखा सण यामध्ये साजरा केला जातो, ज्यामुळे तिळगुळ आणि उडत्या पतंगांचे आनंद घेतले जातात.

महत्वाचे दिवस :-
१) गणतंत्र दिन, २) मकर संक्रांती.

माघ (Magha)

मराठी कॅलेंडरनुसार माघ हा अकरावा महिना आहे. आणि ह्याचा कालवधी फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्याने आहे.
माघ महिना या कालावधीत पूजा आणि धार्मिक उत्सवांचे महत्त्व असते. यामध्ये माघ स्नान आणि माघ शंक्रांत सारखे धार्मिक कार्य होतात.

महत्वाचे दिवस :-
१) महाशिवरात्री,
२) छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार).

फाल्गुन (Phalguna) – रंगांचा महिना

वर्षातला बारावा आणि शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. आणि इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे मार्च आणि एप्रिलच्या दरम्याने ह्याचा कालावधी आहे.
फाल्गुन महिनात होळी आणि धुलीवंदनाची धमाल आहे. लोक विविध रंगांची उधळण करून आनंद साजरा करतात, आणि गोडधोड खाण्याचा विशेष महत्त्व असतो.

महत्वाचे दिवस :-
१) होळी, २) धूलिवंदन.

Conclusion :

आपल्या सांस्कृतिक धरोहराला साजरे करत असतात. या महिने आणि त्यांचे सण आपल्याला जीवनातील आनंद आणि समृद्धी देतात.

मराठी महिन्यांबद्दल थोडक्यात :

१. मराठी महिने का महत्वाचे आहेत?

मराठी महिने आपल्या संस्कृतीच्या परंपरेचे प्रतीक आहेत. ते चंद्रवर्षाच्या आधारे तयार केले जातात आणि प्रत्येक महिना आपल्या समाजाच्या धार्मिक, सामाजिक, आणि कृषी जीवनाशी संबंधित आहे.

२. कोणत्या महिन्यात मराठी नववर्ष असतो?

मराठी नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवशी असतो, जो चैत्र महिन्याचा पहिला दिवस आहे.

३. कोणता महिना दिवाळी साजरी करण्यासाठी आदर्श आहे?

आश्वयुज महिना दिवाळी साजरी करण्यासाठी आदर्श आहे. या महिन्यात दसरा आणि दीपावली सारखे मोठे सण साजरे केले जातात.

४. मराठी महिने चंद्रवर्षावर आधारित का असतात?

हो, मराठी महिने चंद्रवर्षावर आधारित असतात. त्यामुळे हे महिने ग्रीगोरियन कॅलेंडरपेक्षा थोडे वेगळे असतात.

५. मराठी महिन्यांमध्ये कोणते महत्त्वाचे सण साजरे केले जातात?

मराठी महिन्यांमध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक सण साजरे केले जातात,
उदा:-
चैत्र: मराठी नववर्ष
वैशाख: शेतकऱ्यांचा महत्त्वपूर्ण महिना
भाद्रपद: गणेश चतुर्थी
श्रावण: शिवरात्री आणि नागपंचमी
आश्विन: दसरा, दिवाळी

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

डिस्क्लेमर : “मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name

The post मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name appeared first on Topic Raja.

]]>
सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg Fort Information In Marathi https://topicraja.com/sindhudurg-fort-information-in-marathi/ Sun, 13 Jul 2025 15:31:32 +0000 https://www.topicraja.com/?p=45 सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठीत | Sindhudurg Fort Information in Marathi ( Sindhudurg killa chi mahiti…

The post सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg Fort Information In Marathi appeared first on Topic Raja.

]]>
सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठीत | Sindhudurg Fort Information in Marathi ( Sindhudurg killa chi mahiti Marathi madhun, सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी मधून, Sindhudurg Fort in Marathi).
या लेखात सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास आणि माहिती मराठी मधून तुम्हाला वाचायला मिळेल.

आज आपण माहिती घेणार आहोत, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आणि पाऊलखुणा जपणाऱ्या एका किल्ल्याची. भारतातील सागरी अभियांत्रिकीच्या अनेक प्राचीन विलक्षण नमुन्यांपैकी एक दिमाखदार रचना म्हणजे “किल्ले सिंधुदुर्ग”.

सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg Fort Information
सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg Fort Information

सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती मराठी | Sindhudurg Fort Information in Marathi

किल्ल्याचे नाव :- सिंधुदुर्ग किल्ला
प्रकार :- जलदुर्ग
ठिकाण :- सिधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरा जवळ १.६० किलो मीटर अंतरावर.
बेट :- खुर्ते
स्थापना :- इ. स. १६६४
एकूण क्षेत्रफळ :- ४८ एकर
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :- होडीने ( मालवण धक्क्यापासुन ते किल्लापर्यंत )

१६६४ साली खुर्त्त नावाच्या खडकाळ बेटावर किल्ला उभारण्याचा वसा शिवाजी महाराजांनी घेतला. हिरोजी इंदुलकरांच्या नेतृत्वाखाली हजारो मावळ्यांच्या अथक परिश्रमाने अखेर १६६७ च्या दरम्यान हा वसा मूर्तस्वरुपास आला.

सुमारे ३ किलोमीटर च्या परिसरात असलेल्या साधारण ४८ एकर वावरात या किल्ल्याची सफर करताना तेथील जाणकार मार्गदर्शक जरूर बरोबर घ्यावा. त्याच्या माहितगार नजरेतून हा किल्ला पाहताना समोर येणारे बांधणीचे बारकावे मन थक्क करणारे ठरतात.

शिसे, गुळ आणि चुन्याने भक्कम अश्या या बांधकामाची प्रत्येक लांबी, रुंदी तथा उंची अतिशय उद्दिष्टपुर्ण रचनेत जाणवते.

इथल्या टेहळणी बुरुजावरून दृष्टिक्षेप टाकताच, कोकण किनारपट्टीवर साडेतीनशेहून अधिक शतके विराजमान असलेल्या या रचनेचे भौगोलिक वैशिट्य आपोआपच अधोरेखित होते.

टेहळणी बुरुजाची छायाचित्रे

टेहळणी बुरुज | Tehalani Buruj
टेहळणी बुरुज | Tehalani Buruj
टेहळणी बुरुज | Tehalani Buruj
बुरुज | Tehalani Buruj
सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती
सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg Fort Information

किल्ला वरील भुयारी मार्ग, खुष्कीच्या वाटा, नगारे बांधणी, बुरुजांची आखणी, दरवाजांच्या परिसरातील सुरक्षितता, असुरक्षित भासणाऱ्या जागी असणारी त्वरित सौरंक्षक योजना सारं काही मंत्रमुग्ध करतं.

पाण्याचे साठे, धान्याची कोठारे, खजिने आणि लढाई सामग्रीच्या जागा, घोडदळाचा पागा सारंकाही व्यवस्थापनाच्या अभिजात कौशल्याची उत्तुंग झळाळी दाखवत राहतं.

कडेलोटाचं टोक आणि कोठडीचं नुसतं प्रवेशद्वार पाहूनसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणारं अतिशय भयावह दृश्य आकलनास येतं.

असा हा जलदुर्ग किल्ला आवर्जून भेट द्यावी अशी एक ऐतिहासिक जागा आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्याची वेळ आणि प्रवेश शुल्क
To reach on Sindhudurg Fort timings and entry fee

मालवण धक्क्यावरून या किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या सुटतात. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत फक्त होडीच्या मार्गे या किल्ल्यावर जाता येतं. भारतीय पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क ५० रु. आहे, आणि विदेशी पर्यटकांसाठी हे शुल्क २०० रु. आहे.

होडीने या दुर्गाच्या दिशेने केलेला छोटासा प्रवास वर्तमानातून शिवकालीन इतिहासाकडे नेणारा ठरतो. या किल्ल्यावर आजही काही वसाहतींचे वास्तव्य आहे. आई भवानीच्या मंदिराचं पावित्र्य राखण्याबरोबरच नेमाने नित्य उत्साहात तिचा उत्सव इथे साजरा करण्यात येतो.

महाराजांच्या आदर्शांचं पालन करण्यासाठी येथील प्रत्येक जण सतर्क तर असतोच, शिवाय येथे येणाऱ्या प्रत्येकात ती जागरूकता आवर्जून पोहोचवली जाते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पाहण्यासारखी मुख्य आकर्षणे
Most important places to see on Sindhudurg Fort

  • प्रवेश द्वार​
  • गोड्या पाण्याची विहीर ( दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर )​
  • शिवराजेश्वरांचे मंदिर​
  • शिव मंदिर​

किल्ल्याबद्दल महत्वाचे प्रश्न – Quiz regarding Sindhudurg Fort

१. कुठल्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सिंधुदुर्ग जिल्हा.

२. निर्मिती कधी करण्यात आली ?
उत्तर: १६६४ ते १६६७

३. किल्ला कुणी बांधला ?
उत्तर: हिरोजी इंदुलकरांच्या नेतृत्वाखाली

४. किल्ल्याची उंची किती आहे ?
उत्तर: सुमारे ३०-३५ फूट

वरील लेख “सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | Sindhudurg Fort Information in Marathi”

वरील लेख “सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी | Sindhudurg Fort Information in Marathi”

नक्की वाचा :- कार्तिकी एकादशी मंदिरात दिव्यांची आकर्षक आरास

  • sindhudurg killa सिंधुदुर्ग किल्ला का प्रसिद्ध आहे?

The post सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती | Sindhudurg Fort Information In Marathi appeared first on Topic Raja.

]]>