पारंपारिक कार्यक्रम - Traditional Events Archives - Topic Raja https://topicraja.com/category/traditional-events/ On topicraja.com, You will get to read articles on topics like Marathi cultural programs, articles on Marathi traditional programs, travel related ideas, and general knowledge. Sun, 23 Nov 2025 05:53:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.0.2 https://topicraja.com/wp-content/uploads/2025/07/topic-raja-logo-150x150.png पारंपारिक कार्यक्रम - Traditional Events Archives - Topic Raja https://topicraja.com/category/traditional-events/ 32 32 Chaitra navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी https://topicraja.com/chaitra-navratri-2025-dates-shubh-muhurat-maa-durga-puja-vidhi/ Mon, 22 Sep 2025 06:49:17 +0000 https://topicraja.com/?p=186 Navratri 2025 : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी शारदीय नवरात्रला २२…

The post Chaitra navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी appeared first on Topic Raja.

]]>
Navratri 2025 : हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्व दिले जाते. या वर्षी शारदीय नवरात्रला २२ सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे. नवरात्र २०२५ सोमवारी 22 सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि 02 ऑक्टोबर रोजी गुरुवारी विजययदशामी उत्सवासह समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, २०२५ यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होते.

नवरात्र पूजा याबाबतची माहिती आज आम्ही Topic raja डॉट कॉम या वेब पेजद्वारे घेऊन आलो आहोत. तर चला मग, पाहुयात नवरात्र.

नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी

सणनवरात्र
घटस्थापना मुहूर्त२२ सप्टेंबर २०२५, सोमवार.
सकाळी ०६ वाजून १९ मिनटे ते १० वाजून १९ मिनटे
नवरात्रि चा शुभारंभ२२ सप्टेंबर २०२५, सोमवार.
ईष्ट देवतादुर्गा देवी
दसरा०२ ऑक्टोबर २०२५, गुरुवार.

नवरात्री २०२५ तिथि – Navratri 2025 Dates

दिवस आणि तारीखसणतिथि
२२ सप्टेंबर २०२५, सोमवारघटस्थापना, शैलपुत्री पूजाप्रतिपदा
२३ सप्टेंबर २०२५, मंगळवारब्रह्मचारिणी पूजाद्वितीया
२४ सप्टेंबर २०२५, बुधवारचंद्रघंटा पूजात्रितिया
२५ सप्टेंबर २०२५, गुरुवारकुष्मांडा पूजाचतुर्थी
२६ सप्टेंबर २०२५, शुक्रवारस्कंदमाता पूजापंचमी
२७ सप्टेंबर २०२५, शनिवारकात्यायनी पूजाषष्टी
२८ सप्टेंबर २०२५, रविवारकालरात्री पूजासप्तमी
२९ सप्टेंबर २०२५, सोमवारमहागौरी पूजाअष्टमी
३० सप्टेंबर २०२५, मंगळवारसिद्धीदात्रीनवमी
०२ ऑक्टोबर २०२५, बुधवारविजयादशमी, शस्त्रपूजा, दसरादशमी

डिस्क्लेमर : “Navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.

The post Chaitra navratri 2025 dates shubh muhurat maa durga puja vidhi – नवरात्र २०२५ शुभ मुहुरात, पूजा विधी appeared first on Topic Raja.

]]>
Sukhkarta Dukhharta lyrics in marathi – सुखकर्ता दुखहर्ता https://topicraja.com/sukhkarta-dukhharta-varta-vighnachi-ganpati-aarti/ Mon, 14 Jul 2025 14:30:59 +0000 https://www.topicraja.com/?p=105 Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi Ganesh Aarti…

The post Sukhkarta Dukhharta lyrics in marathi – सुखकर्ता दुखहर्ता appeared first on Topic Raja.

]]>
Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi Ganesh Aarti

॥ गणपतीची आरती ॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव || ०१ ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०२॥

लंबोदर पितांबर फणिवरवंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०३॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शेंदुर लाल चढ़ायो ॥

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे ना जाय लागत हूं पदको ॥०१॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी |
विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी |
कोटि सूरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
गंड-स्थल मदमस्तक झूले शशिबहरी ॥०२॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥०३॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

पारंपारिक कार्यक्रम

Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi

The post Sukhkarta Dukhharta lyrics in marathi – सुखकर्ता दुखहर्ता appeared first on Topic Raja.

]]>