मराठी दिनदर्शिकानुसार मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name आणि त्यांचे महत्व या विषयीची संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. इंग्रजी दिनदर्शिकानुसार १२ महिने असतात, आणि या महिन्यांमध्ये मराठी महिन्यांचा कालावधी तसेच या दरम्यान येणाऱ्या सणांची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि,
१) Marathi Mahine मराठी महिने कोणते आहेत?
२) त्यांची नावे काय आहेत?
३) या महिन्या मध्ये कोणकोणते सण येतात?
४) आणि ह्या सणांचं महत्व काय आहे?

मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name
मराठी महिने त्यांची नावे | Marathi mahine name
मराठी महिनेइंग्रजी महिने
चैत्रएप्रिल आणि मे
वैशाखमे आणि जून
ज्येष्ठजून आणि जुलै
आषाढजुलै आणि ऑगस्ट
श्रावणऑगस्ट आणि सप्टेंबर
भाद्रपदसप्टेंबर आणि ऑक्टोबर
आश्विनऑक्टोबर आणि नोव्हेंबर
कार्तिकनोव्हेंबर आणि डिसेंबर
मार्गशीर्षडिसेंबर आणि जानेवारी
पौषजानेवारी आणि फेब्रुवारी
माघफेब्रुवारी आणि मार्च
फाल्गुनमार्च आणि एप्रिल

वरील माहिती ही २०२४ ह्या इंग्लिश आणि मराठी कॅलेंडर प्रमाणे आहे,

मराठी महिने त्यांची नावे, मराठी महिने यादी व मराठी महिन्यांची नावे | Marathi mahine list | Marathi months name | Marathi mahine name.

चैत्र

मराठी दिनदर्शिकेतील आणि मराठी वर्षातील पहिला महिना म्हणजे चैत्र. इंग्रजी कॅलेंडरनुसार एप्रिलच्या दरम्याने हा महिना असतो. चैत्रतचं मराठी नववर्षाची सुरुवात होते, म्हणून याच महिन्यात गुढीपाडवा साजरा केला जातो. तसेच भगवान श्रीरामाचा जन्मदिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो.

महत्वाचे दिवस :- १) गुढीपाडवा (साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त), २) श्री राम जन्मदिन - रामनवमी, ३) हनुमान जयंती.

वैशाख

वसंत ऋतूमधला आणि मराठी वर्षातला दुसरा महिना म्हणजे वैशाख. इंग्रजी कॅलेंडरनुसार मे मध्ये हा महिना असतो.

महत्वाचे दिवस :- १) महाराष्ट्र दिन, २) अक्षय तृतीय, ३) बुद्ध पौर्णिमा ४) पीक कापणीचा हंगाम, ५) कापणी हंगाम

ज्येष्ठ

मराठी कॅलेंडरनुसार तिसऱ्या क्रमांकाचा आणि इंग्लिश कॅलेंडरनुसार जून मध्ये येणार ज्येष्ठ हा महिना आहे. हिंदु धर्मात, ह्या काळात विवाहित स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे.

महत्वाचे दिवस :- १) वटपौर्णिमा

आषाढ

हिंदू पंचांग अनुसरे, वर्षातला चौथा महिना म्हणजे आषाढ. इंग्लिश कॅलेंडरच्या जुलै मध्ये आषाढ चा कालावधी असतो.
भारतीय संस्कृतीत गुरूंचा आदर केला जातो, आणि गुरूंना मानवंदना म्हणून ह्याच महिन्यात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तसेच वर्षातील येणाऱ्या एकादशींपैकी एक आषाढी एकादशी ह्या महिन्यात असते. अनेक विठ्ठलाचे भक्त आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल - रुख्मिणीच्या दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या वारीला जातात.

महत्वाचे दिवस :- १) आषाढी एकादशी, २) गुरु पौर्णिमा

श्रावण

हिंदु दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना असतो, आणि इंगजी कॅलेंडरप्रमाणे जुलै आणि ऑगस्टच्या दरम्याने श्रावण असतो. तसेच ह्या महिन्यात भरपूर पाऊस पडत असतो. भारताचा स्वतंत्र दिन हा ह्या महिन्याच्या १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

महत्वाचे दिवस :- १) नाग पंचमी, २) नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, ३) स्वातंत्र दिन, ४) श्रीकृष्ण जयंती, गोकुळाष्ठमी, ५) बैलपोळा, ६) हरितालिका तृतीया

भाद्रपद

लहान - थोरांच्या आवडीचा लाडक्या गणपती बाप्पाचे ( गणेश चतुर्थी ) आगमन भाद्रपद महिन्यात होते. हा वर्षातला सहावा महिना असतो, आणि त्यानंतर भारतीय परंपरेनुसार देवीची पूजा केली जाते, देवींचे आगमनही ह्याच महिन्यात असते. इंग्रजी दिनदर्शिकानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या दरम्याने भाद्रपदचा कालावधी असतो.

महत्वाचे दिवस :- १) श्रीगणेश चतुर्थी, २) अनंत चतुर्थी, ३) घटस्थापना

आश्विन

आश्विन हा ह्या वर्षातला सातवा आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर च्या दरम्याने असणारा महिना. घटस्थापनापासून आश्विन महिन्याची सुरुवात होते. ह्याच महिन्यात भारतीय संस्कृतीप्रमाणे दसराच्या दिवशी हत्यारांची पूजा करण्याची प्रथा आहे.

महत्वाचे दिवस :- १) दसरा, २) कोजागिरी पॊर्णिमा, ३) धनत्रयोदशी, ४) नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन

कार्तिक

इंग्रजी दिनदर्शिकानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्याने आणि वर्षातला आठवा महिना कार्तिक असतो. बलिप्रतिपदा आणि दीपावली पडावा ह्या दिवाळीच्या दिवसापासून कार्तिक महिन्याची सुरुवात होते.

महत्वाचे दिवस :- १) बलिप्रतिपदा, दीपावली पडावा, भाऊबीज, २) गुरु नानक जयंती

मार्गशीर्ष

वर्षातला नववा महिना, तसेच इंग्रजी कॅलेंडरनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या दरम्याने मार्गशीर्षचा कालावधी असतो.

महत्वाचे दिवस :- १) श्रीदत्त जयंती

पौष

पौष हा दहावा महिना आहे. आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर व जानेवारीच्या दरम्याने असतो तसेच कॅलेंडर इयरनुसार ह्या महिन्यात नवीन वर्षाची सुरुवात होते.

महत्वाचे दिवस :- १) ख्रिसमस नाताळ, नवीन वर्षाची सुरुवात

माघ

मराठी कॅलेंडरनुसार माघ हा अकरावा महिना आहे. आणि ह्याचा कालवधी जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्याने असतो. भारताचा प्रजासत्ताक दिन ह्या महिन्यात २६ जानेवारीला असतो.

महत्वाचे दिवस :- १) प्रजासत्ताक दिन, २) महाशिवरात्री, ३) छत्रपती शिवाजी महाराज जयंती

फाल्गुन

वर्षातला बारावा आणि शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. आणि इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्याने ह्याचा कालावधी असतो. होळी आणि धुलीवंदनाच्या धमाल ह्याच महिन्यात असते.

महत्वाचे दिवस :- १) होळी, धूलिवंदन