Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi Ganesh Aarti

Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi - सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची Lyrics in Marathi

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ गणपतीची आरती ॥

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव || ०१ ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।
जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०२॥

लंबोदर पितांबर फणिवरवंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।
जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामना पुरती
जयदेव जयदेव ॥०३॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शेंदुर लाल चढ़ायो ॥

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।
महिमा कहे ना जाय लागत हूं पदको ॥०१॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

अष्टो सिद्धि दासी संकटको बैरी |
विघनाविनाशन मंगल मूरत अधिकारी |
कोटि सूरजप्रकाश ऐसी छबी तेरी |
गंड-स्थल मदमस्तक झूले शशिबहरी ॥०२॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।
संतति संपत्ति सबहि भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥०३॥
जय जय श्री गणराज विद्यासुखदाता ।
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता ।
जयदेव जयदेव ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ शंकराची आरती – लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ॥

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥०१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥०२॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥०३॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥०४॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥

─── ⋆⋅☆⋅⋆ ───

॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ॥

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥०१॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥०२॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥०३॥

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी । जयदेवी जयदेवी ॥

पारंपारिक कार्यक्रम

Sukhkarta Dukhharta Varta Vighnachi – सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची आरती Lyrics in Marathi