सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi हे मंत्र जसजसा आपण सराव करतो, तसातसा आपल्याला ह्याचा फायदा देखील होतो. चला, ह्या लेखात पाहुयात सूर्यनमस्कार मंत्र.

योगासनांमध्ये सूर्यनमस्कार हा एक व्यायामाचा प्रकार आहे. त्या सोबत हे मंत्र म्हटले जातात, ह्या मुळे शरीर, श्वास आणि मन सुधारतात. सूर्यनमस्कार हा व्यायाम केल्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि चांगले राहते, तसेच आपल्या स्मरणशक्तीचा विकास करू शकतो.

सूर्यनमस्कार मंत्र - Surya namaskar mantras in marathi

सूर्यनमस्कारासाठी विश्राम व सावधानची स्थिती खालीलप्रमाणे असावी.

विश्राम : दोन्ही पायांमध्ये एक ते दीड फूटाचे अंतर ठेवावे. डाव्या हाताच्या तळव्यामध्ये उजवा हात याप्रमाणे दोन्ही हात पाठीमागे पकडावे.

सावधान : डावा पाय उचलून उजव्या पायाजवळ आणावा. पायांच्या टाचा एकमेकांना जुळलेल्या ठेवाव्या. दोन्ही पायांचे पंजे ४५० कोनात असावे. दोन्ही हातांच्या मुठी अर्धवट मिटलेल्या व दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवावे.


सूर्यनमस्कार मंत्र व बारा नावे अशी आहेत:

  1. ओम मित्राय नमः
  2. ओम रवये नमः
  3. ओम सूर्याय नमः
  4. ओम भानवे नमः
  5. ओम खगाय नमः
  6. ओम पूष्णे नमः
  7. ओम हिरण्यगर्भाय नमः
  8. ओम मरीचये नमः
  9. ओम आदित्याय नमः
  10. ओम सवित्रे नमः
  11. ओम अर्काय नमः
  12. ओम भास्कराय नमः

तसेच सूर्यनमस्कार मुळे मिळणारे फायदे इथे वाचा

डिस्क्लेमर : “सूर्यनमस्कार मंत्र – Surya namaskar mantras in marathi” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.