सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi

सूर्यनमस्कार मंत्र - Surya namaskar mantras in marathi

१. सूर्यनमस्कार ही एक जलद प्रकारे करावयाचा व्यायाम आहे, ह्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तसंचालन उत्तम प्रकारे होते.

२. शरीरातील सर्व मांसपेशी, नाड्या व स्नायू पूर्णपणे कार्यक्षम होतात.

३. वयोमानामुळे होणारी इंद्रियांची व शरीराची झीज कमी केली जाते.

४. शरीरावर साठलेला अनावश्यक मेद कमी केला जाऊन शरीर सुडौल केले जाते.

५. सूर्यनमस्कारामध्ये वेगवेगळी आसने आपोआपच होत असल्यामुळे मस्तकापासून पायाच्या तळव्यापर्यंत सर्व सांधे व स्नायूंना व्यायाम घडतो.

६. सूर्य हा वैद्य व औषधांचा राजा आहे. शास्त्राने सूर्याला आरोग्याचे मूळ म्हटले आहे. नील लोहातीत किरणाद्वारे (Ultra Violet) आजकाल अनेक असाध्य रोग बरे केले जातात. प्रातःकाळी जोपर्यंत सूर्याचा रंग लाल असतो, तोपर्यंत त्यातून हेच किरण निसर्गतः निघत असतात. यावेळी कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये सूर्यनममस्कारांचा अभ्यास केल्यास विशेष फायदे मिळतात.

७. शरीरातील रोग प्रतिबंधक शक्ती वाढीला लागते. हृदयाची कमजोरी, भयगंड, छातीत धडधडणे इ. ने ग्रस्त व्यक्तींनी ओम् व ध्वन्यात्मक बीजाक्षरांसह तसेच प्रकृतीनुसार सूर्यनमस्कार केल्यास वरील विकारांवर चांगला प्रभाव पडतो.

तसेच सूर्यनमस्कार मंत्र समजून घेण्यासाठी इथे वाचा


डिस्क्लेमर : “सूर्यनमस्कार फायदे – surya namaskar benefits in marathi” – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. Topic Raja समूह कोणत्याही चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

आपला अभिप्राय शेअर करण्यासाठी आम्हाला asktopicraja@gmail.com वर लिहा.