शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी, आपण आज ह्या लेखातून पाहणार आहोत. Shirdi Sai Baba Mandir – शिर्डी साई बाबा मंदिर महाराष्ट्रातील संतभूमी ‘शिर्डी.
Shirdi Sai Baba Mandir
महाराष्ट्र ही ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखली जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह साईबाबा यांचे लाखो अनुयायी आज देशभर पसरले आहेत. साईबाबा हे महाराष्ट्रातील एक महान योगी व आध्यात्मिक गुरु मानले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी साईबाबांची विविध प्रकारची मंदिरे आपल्याला पहायला मिळतात, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे असणार्या साईबाबांच्या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, साईबाबा जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा ते फक्त 16 वर्षांचे होते. नंतर ते शिर्डीमध्येच राहू लागले आणि 1918 मध्ये साईबाबांनी शिर्डीमध्ये समाधी घेतली. त्यांच्या विनंतीनुसार, त्यांच्या मृत्यूनंतर गावकर्यांनी त्यांचे पार्थिव एका निश्चित ठिकाणी पुरले आणि त्यावर समाधी मंदिर बांधले. 1954मध्ये समाधीशेजारी बसलेल्या स्थितीत साईबाबांची संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हे घर संतांसाठी विश्रामगृह म्हणून वापरले जात होते आणि ते नागपुरातील कोट्यधीश गोपाळराव बुटी यांनी बांधले होते.
शिर्डी येथे स्थित श्री साईबाबा संस्थान ट्रस्टतर्फे मंदिरातील सर्व व्यवस्था पाहिली जाते. या अनोख्या साईमंदिराला दर दिवशी हजारो भक्त भेटी देतात. चला तर मग जाणून घेऊया शिर्डीबद्दलची थोडी माहिती…
मुंबईपासून 300 किमी अंतरावर साईबाबांचे हे मंदिर आहे.
कसे पोहोचायचे शिरडीला (How to Reach Shirdi)
- मुंबई ते शिर्डी रेल्वे किंवा खासगी बसने जाता येते
- मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस (vande bharat express)
- दादर – साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाडमार्गेही जाता येते.
- मुलुंड आणि ठाणे रेल्वेस्टेशनच्या बाहेरूनही खासगी कंपनीच्या बसेस शिर्डीला जाण्यासाठी सुटतात.
- मुंबई ते नाशिक रेल्वे आणि नंतर खासगी बसने शिर्डीपर्यंत पोहोचता येते.
शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर 28 मे 1923 रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज 2019 साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.
शिर्डीत कुठे मुक्काम करावा (Where to Stay In Shirdi)
पिकनिकला जाताना आपण नेहमीच किती किंमतीत चांगल्या सोयीसुविधा असणारी ठिकाणी शोधत असतो. शिर्डीला साई संस्थानामार्फत अगदी माफक दरात भक्तांसाठी भक्तनिवास उपलब्ध करण्यात आले आहेत. येथील रूम बुकिंग (shirdi room booking) सेवाही अगदी सहज सोपी आहे.
- द्वारावती भक्तनिवास ( Dwaravati Bhaktniwas – ३३४ रूम )
- साईबाबा भक्तनिवासस्थान ( Saibaba Bhaktaniwassthan – ५४२ रूम )
- साईआश्रम भक्तनिवास ( Saiashram Bhaktniwas – १५३६ रूम )
रूम बुकिंग कसे करावे (Shirdi sansthan room booking)
अशाप्रकारचे तीन पर्याय मिळतात. रूम बुकिंग फक्त room booking online करावे लागते. येथे counter बुकिंग करता येत नाही आहे.
Shirdi Sai Baba Mandir – शिर्डी साई बाबा मंदिर जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी
Sai baba darshan
श्रीसाईबाबांचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने भक्तगण येत असतात. असे असले तरीदेखील प्रत्येक जण रांगेत उभे राहून शिस्तीत साईबाबांचे दर्शन घेतो.
श्री साईबाबा मंदिरातील आरतीच्या वेळा:
- भूपाली आरती- 4:15 बजे (At Morning)
- काकड़ आरती- 4:30 (At Morning)
- मध्यान आरती- 12:00 बजे (At Noon)
- धूप आरती- सूर्यास्तानंतर (At Evening)
- सेज आरती- 10:30 बजे (At Night)
दर गुरुवारी साईबाबांची पालखी निघते. साईबाबा मंदिर ते दवराक्मी आणि रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान परत मंदिरात पालखी येते. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होते.
दररोज नित्यनियमाने साईबाबांच्या मंदिरात बाबांची आरती होते. त्यानंतर पूजा व अभिषेक केला जातो. याव्यतिरिक्त साई मंदिरात संपूर्ण वर्षभरात अनेक कार्यक्रम भक्तगणाकडून राबविले जातात. साई बाबांची जी मूर्ती आहे ती अतिशय मनमोहक व सुंदर आहे. त्यांची मूर्ती बघितल्यानंतर भक्तगणांच्या मनाला शांती व आनंद लाभतो.
चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय – Sai Baba Sansthan canteen
प्रत्येक भक्तनिवासामध्ये कँटीन आहे, जिथे सकाळचा नाश्ता करू शकतो, पण दुपारी व रात्री जेवणासाठी भोजनालयात जावे लागते, जे मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे.
शिर्डीमध्ये भेट देण्याची महत्त्वाची ठिकाणे
- शिर्डी साई बाबा मंदिर – Shirdi Sai Baba Temple
- शनी शिंगणापूर – Shani Shingnapur
- हनुमान मंदिर / मारुती मंदिर – Hanuman Mandir / Maruti Mandir
- द्वारकामाई – Dwarkamai
- बाबा चावडी – Baba Chavadi
शिर्डीला जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ (Best Time To Go Shirdi)
शिर्डीला केव्हाही भेट देता येते. धार्मिक स्थळ असल्याने कोणत्याही विशेष प्रसंगी येथे मोठी गर्दी असते. विशेषत: उन्हाळ्याच्या सुटीत येथे मोठी गर्दी असते. शिर्डीला जाण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ आहे. याशिवाय सोमवार आणि शुक्रवारीही मंदिरात कमी गर्दी असते.
शिर्डीत कोणत्या गोष्टी करणे टाळावे (Things to avoid in Shirdi)
- फुले, हार, मोबाईल, कॅमेरा दर्शनाला जाताना नेऊ नये.
- भक्तगणांचे मोबाइल ठेवण्यासाठी संस्थानातर्फे सोय करण्यात आली आहे. चपल स्टँडप्रमाणे मोबाईल व कॅमेरा जमा करून आपण पावती घेऊ शकतो.
साईबाबांना समाधी घेऊन 100 पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत पण साईबाबांना समाधी घेणे अगोदरपासून काही लोक त्यांना आपले गुरु मानत. ज्यांना आध्यात्माची आवड आहे त्यांच्यासाठी साईबाबा सर्वात मोठे प्रेरणास्त्रोत आहे. साईबाबांनी हिंदू व मुस्लिम समाजाला एक करण्यासाठी काम केले. त्यामुळेच आजच्या घडीला सर्व धर्माचे लोक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. साईबाबांच्या शिर्डीला गुरुवारचे खूप महत्त्व आहे. या दिवशी साईबाबांच्या शिर्डीला मोठ्या संख्येने भक्तगण साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावत असतात.
नक्की वाचा :- Tarkarli beach things to do | तारकर्ली बीच प्रेक्षणीय स्थळे